Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घर सोडणार्‍या मुलींना सातारा पोलिसांनी तडपेने शोधून केले पालकांच्या हवाली,आई वडलांचे केले समुपदेशन

Spread the love

औरंगाबाद – घरातील कटकटींना कंटाळळून सातारा परिसरातील दोन मुलींनी घर सोडून नाशिक गाठले.या प्रकरणी सातारा पोलिसांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखंत पोलिसांचे एक पथक नाशिकला पाठवून मुलींना सुखरुप ताब्यात घेत पालकांच्या हवाली केले.

१९जानेवारी रोजी दोन्ही मुली त्यापैकी एक१८तर दुसरी १६ वर्षे वयाची आहे. अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करंत पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने नाशिकच्या सातपूर परिसरातून मुलींना शोधून काढले. व पालकांच्या हवाली केले.मुलींच्या वडलांना रोजगार नसल्यामुळे ते दारुच्या व्यसनात बुडाले तर आई मोलमजूरी करुन मुलींचा सांभाळ करंत होती.पण मुलींना हा प्रकार असह्य झाल्यामुळै त्यांनी घर सोडले. मुलींना आईवडलांच्या ताब्यात देतांना त्यांचे योग्य समुपदेशन केले.कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी सातारा पोलिसांनी दाखवलेली तत्परता याविषयी त्यांचे कौतूक होत आहे.आपण एक सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान मिळाल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!