Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate :  पश्चिम बंगालच्या धुपगुडी शहरात भीषण अपघात, १३ ठार , १८ जखमी

Spread the love

काल गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर आज  पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील धुपगुडी शहरात धुक्यामुळे अंदाज न आल्यामुळे विचित्र अपघात घडला. अनेक वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एक डंपर नदीतील खडी घेऊन जात होता. तर समोरून विरुद्ध दिशेनं टाटा मॅजिक आणि मारुती व्हॅन येत होती. धुके असल्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही त्यामुळे तिन्ही वाहनांनी एकमेकांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, खडीने भरलेला डंपर इतर वाहनांवर कोसळला. त्यामुळे खडी खाली इतर वाहनं अडकली आणि यात त्यांचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. खडीने भरलेला डंपर हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. या अपघातात १८ जण जखमी झाले आहे. जखमींना धुपगुडी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान धुक्यामुळे झालेल्या या अपघातात अनेक वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल असून मदतकार्य सुरू आहे. मृत व्यक्तींचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!