Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भंगार चोरी करुन खरेदी विक्री करणार्‍या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना गुन्हेशाखेने पुन्हा बेड्या ठोकल्या

Spread the love

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातून काॅपर वायर व इतर साहित्य चोरुन खरेदी विक्री चे व्यवहार करणार्‍या दोघांना गुन्हेशाखेने जेरबंद केले.या गून्ह्यातील फरार आरोपींनी वाळूज औद्योगिक परिसरात अनेक गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती गुन्हे शाखेला आहे.पण फरार आरोपीं पकडल्यानंतरच गुन्हे दाखल होतील.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.
कंपनीतील तीन लाख ८६ हजार १४४ रुपयांचे कॉपर वायर, बोल्ट, प्लेट चोरणारा गजाजन उर्फ गजु आसाराम घावटे (रा. जोगेश्वरी) याच्यासह चोरीचे साहित्य घेणारा अब्दुल वहाब शेख अब्दुल करीम (५५, रा. जयसिंगपूरा संजीवनी अपार्टमेंटच्या पाठीमागे, बेगमपूरा) याला अटक करण्यात आली.तर फरारआरोपी विजय साळवे रा. उस्मानपुरा आणि गोविंद भोपळे हे प्रमुख आरोपी आहेत.

या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात करोडी शिवारातील कंपनीतील साहित्य चोरी गेल्याप्रकरणात भादंवि ३८०, ४६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना सदर चोरी गजानन घावटे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केली असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने घावटे याला अटक केली.

पोलिसांनी घावटे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पोलिसांना राजु साळवे (रा. उस्मानपूरा) गोविंद भोपळे (रा. माजलगाव) अशा तिघांनी मिळून १४ जानेवारीच्या पहाटे कंपनीचे लोखंडी दरवाज्याचे कुलूप कोयंडा तोडून कंपनीत प्रवेश करुन कंपनीत ठेवलेल्या रॅकमधून प्लास्टीक बॅगमध्ये ठेवलेले कॉपर बोल्ट ,कॉपर प्लेट व बॉक्स मध्ये ठेवलेले कॉपर वायरचे बंडल त्यानंतर एका गोणीत टाकून वहाबच्या दुकानात तिघांनी मिळून विकल्याची कबुली पोलिसांना दिली. यातून प्रत्येकाला २८ हजार रुपये मिळाल्याचेही संशयितांनी पोलिसांना सांगितले.

वहाबने चोरट्यांकडून एक लाख ३ हजार ८९६ रुपयांचे कॉपर बोल्ट (१८१३२ नग), २३ हजार ८७४ रुपयांचे कॉपर प्लेट (२०, ७६०), तसेच ८० हजार १५७ रुपयांचे कॉपर वायर (१०५ किलो) असा एकूण अंदाजे दोन लाख ७ हजार ९२७ रुपयांचा ऐवज खरेदी केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, नंदकुमार भंडारे, पोलीस अंमलदार किरण गांवडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, राजकुमार सुर्यवंशी, धर्मराज गायकवाड, नितिन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!