Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे लागत आहेत निकाल, दिगजांच्या लढतीचे असे आहे चित्र….

Spread the love

राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत असून कठल्या जिल्ह्यात कुणाची हार आणि कुणाची जीत झाली ? याचे चित्र एकत्रिरीत्या देत आहोत.  गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये या निवडणुकीमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. राज्यात लक्ष लागलेल्या राळेगण सिद्धी मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे तर आदर्श गाव पाटोद्यात देशभर गाजलेले सरपंच विठ्ठलराव पेरे पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीत त्यांच्या मुलींचाही पराभव झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. हातकणंगले तालुक्यातील पाडळी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती आला आहे. यामध्ये आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे.

भास्कररावर पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव

गेल्या २५ वर्षांपासून पाटोदा गावात सरपंच म्हणून बाजी मारणारे भास्कररावर पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदाच्या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यात पाटोद्याला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देणारे भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवून विजय मिळवला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.

आपल्या २५ वर्षाच्या काळात भास्करराव पेरे पाटील यांनी पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली होती. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कन्या अनुराधा या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचं संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे. पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडणून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलनं सत्ता मिळवली आहे.

आतापर्यंत हाती आलेले सविस्तर निकाल असे आहेत 

अहमदनगरच्या बहुचर्चित हिवरेबाजार पाठोपाठ राळेगणसिद्धीमध्येही बंड फसले असून ग्रामविकास पॅनलच्या ताब्यात सत्ता, या निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या बिनविरोध पॅनलला  विरोध करीत नव्याने स्थापन झालेल्या शाम बाबा पॅनलचा सपशेल पराभव झाला आहे. नेवासा तालुक्यातील सोनई ग्रामपंचायतीत १३ जागा जिंकत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम. विरोधी माजी खासदार तुकाराम गडाख यांना अवघी एक जागा मिळाली. संगमनेर तालुक्यालीत कणकवली ग्रामपंचायतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना धक्का बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांची बाजी मारली आहे.

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेची बाजी मारली असून जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला काठावरचा कौल मिळाला आहे.

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या गावात पुन्हा काँग्रेसची सत्ता हस्तगत केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील  खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का, नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून  पैठणमधील बहुचर्चित पाचोड ग्रामपंचायतीमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची एकहाती सत्ता

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांचे वर्चस्व. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना धक्का

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील जलालखेडा, थडीपवनी, खैरगाव, अंबाडा, सायवाडा, महेंद्री, सिंजर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागला आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या मूळगावात भाजपचे पॅनल विजयी. १७ पैकी १२ जागा भाजपनं जिंकल्या असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

तुळजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात जाणार. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरशी

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का, दरम्यान  माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का. त्यांच्या शेजारच्या लोणी खुर्द गावात विखेंच्या पॅनलचा पराभव. १७ पैकी १३ जागा जिंकत विरोधकांनी केली मात. विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेनने मारली बाजी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेनं बाजी मारल्याचं चित्र आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन पक्ष एकत्र आले होते. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर गावातील या युतीची चर्चा होती. या चुरशीच्या लढाईत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांच्या गावात सत्ता मिळवली आहे.

शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत होती. मात्र, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी या युतीविरोधात कडवी झुंज देत शिवसेनेचा विजय खेचून आणला आहे. खानापूरमध्ये ६ जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. तर, विरोधी आघाडी ३, राष्ट्रवादी काँग्रेस- २ आणि काँग्रेसला १ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. परंतु, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या गावातच भाजपला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

प्रकाश आबीटकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे सध्या एकमेव आमदार आहेत. चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक राधानगरी मतदार संघातून लढविणार असल्याची चर्चा दोन वर्षापूर्वी होती. त्यातून आबीटकर व पाटील यांच्यात वादाला तोंड फुटले होते. आबिटकरांनी त्यांना लढून दाखवा असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर दोघातील राजकीय अंतर वाढले होते. आता दादांच्या खानापूर गावातच आबिटकरांनी शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातदेखील भाजपला यश मिळवता आलेलं नाही. शिरोळ तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या सडोली खालसा गावात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आहे.

भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना मोठा धक्का

जामखेड तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना हा मोठा धक्का आहे. शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या चौंडी ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

परळीत धंनजय मुंडे यांच्या बाजूने कौल

बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींपैकी १११ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. जिल्ह्यात १८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. १९२६ उमेदवार आपलं भवितव्य आजमावत होते. या निवडणुकांचा निकाल जाहीर होत असून बीड जिल्ह्यातील परळीतून राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील एकूण 7 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. त्यापैकी 6 ठिकाणी पंकजा मुंडे आणि भाजपच्या गटाला धक्का देत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे. कराडमध्ये काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश, कराडच्या काले ग्रामपंचायतीत भाजपच्या (BJP) पॅनलला 14 जागा, तर पृथ्वीराज चव्हाण गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते.

मुलगी जिंकली खडसे हरले

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जळगावचे राजकारण ढवळून निघाले होते. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत   भाजपने विजय मिळवून गड शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दावा केला आहे. 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून 9 पैकी 6 जागांवर भाजपचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते. मात्र, आता भाजपाचा सरपंच होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!