Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : चीनमध्ये ४,८३६ आईसस्क्रीमचे डबे कोरोना संक्रमित

Spread the love

जगभरात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे कोरोना विषयी अजूनही नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे कोरोनाची दहशत संपलेली नाही असे ही वारंवार सांगण्यात येत आहेत, आतापर्यंत कोरोना व्हायरस मानवांमध्ये पसरत होता आता खाण्याच्या वस्तूमध्ये सुद्धा कोविड १९ ची पुष्टी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. याठिकाणी आईसस्क्रीम कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले आहे.

चीनी अधिकारी या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर तपासामध्ये गुंतले आहेत, स्थानिक दुकानांमध्ये बनवण्यात येणारी आईसस्क्रीमचे तीन नमुने कोरोना व्हायरस संक्रमित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. चीनमध्ये उत्तर पूर्व परिसरातील टियानजिन नगरपालिका हद्दीत ही घटना घडली आहे अशी बातमी स्काय न्यूज यांनी दिली आहे.

टियानजिन डकियाडो फूड कंपनीने या आठवड्यात रोग नियंत्रणासाठी टियानजिन पालिका केंद्रात तीन नमुने पाठवले होते आणि ते तिन्ही नमुने कोरोना संक्रमित आढळले आहे. दरम्यान कंपनीत काम करणाऱ्या १ हजार ६६२ कर्मचार्यांना कोरेनटाइन करण्यात आले. त्यापैकी ७०० कर्मचारी निगेटिव्ह आहे तर, ९६२ कर्मचार्यांचे रिपोर्ट आणखी आले नसल्याचे वृत्त आहे.

या कंपनीकडून ४ हजार ८३६ आईसस्क्रीमचे डबे कोरोना संक्रमित आढळले आहेत. ज्यातील २ हजार ८९ डबे स्टोरेजमध्येच सील करण्यात आले तर संक्रमित डब्यांपैकी १ हजार ८१२ डबे दुसऱ्या राज्यात पाठवण्यात आले आहेत, ९३५ डबे स्थानिक बाजारात आले आहेत, त्यातील ६५ डब्ब्यांची विक्रीही झाली आहे. त्यामुळे चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

यूनिवर्सिटी ऑफ लीड्सचे वायरोलॉजिस्ट डॉक्टर स्टीफन ग्रिफिनच्या म्हणण्यानुसार आईसस्क्रीमच्या डब्ब्यात कोरोनाचे संक्रमण मानवामुळे झाले आहे. उत्पादन होणाऱ्या ठिकाणी व्हायरस पसरला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आईसस्क्रीम फॅटमध्ये बनवली जाते आणि त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येते, त्यामुळे व्हायरस तिथे आढळू शकत नाही. कदाचित कंपनीतल स्वच्छता देखील याला कारणीभूत असू शकते. आईसस्क्रीमचा डबा अचानक कोरोना व्हायरस संक्रमित कसा झाला यावरून घाबरण्याचे कारण नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!