Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVaccine : सावधान… मद्यपानामुळे तुम्हाला होतील अनेक समस्या

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात केली. भारतात लस घेतल्यानंतर अधिकृतपणे, मद्यपानासंबंधी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतु जगभरातील तज्ञांनी लसीकरणाच्या आधी आणि लसीकरणाच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असे म्हटले आहे.

Advertisements

जगभरातील तज्ञांच्या मते, कोरोना लस घेण्याआधी आणि नंतर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्या पैकी एक म्हणजे मद्यपान. मद्यपानाचा रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्यूनिटीवर वाईट परिणाम होतो. यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते. कोरोना लस इम्यूनिटीवरच काम करते. त्यामुळे लस घेण्याआधी आणि लस घेतल्याच्या काही दिवसांनंतरही मद्यपान न करण्याचे तज्ञांचे सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

लसीकरणाच्या किती वेळ आधी आणि किती वेळ नंतर मद्यपान करू नये, याबाबत अनेक तज्ञांचे वेगवेगळे मत आहेत. रशियाच्या हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, स्पुतनिकची लस घेण्याआधी दोन आठवडे आणि लस घेतल्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये. तर, हे वॅक्सिन बनवणारे डॉक्टर अलेक्जेंडर गिन्टबर्ग यांनी, लस घेण्याआधी आणि नंतर तीन दिवसांपर्यंत मद्यपान न करण्याचे सांगितले आहे. ब्रिटनच्या हेल्थ तज्ञांच्या अनुसार, लस घेण्याच्या एक दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर एक दिवसापर्यंत मद्यपान करू नये.

दरम्यान, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे मास्क घालून, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधांनानी देशवासियांना केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!