Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गांजाची तस्करी करणारे पाच जण पोलिसांच्या जाळ्यात, कारसह १२ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंंगाबाद : कारमधुन गांजाची (कॅनबॅस वनस्पती) तस्करी करणाऱ्या पाच जणांना गुन्हेशाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गजाआड केले. अटकेत असलेल्या पाच जणांच्या ताब्यातून पोलिसांनी एक इनोव्हा कारसह ५७ किलो ३८२ ग्रॅम गांजा असा एकूण १२ लाख ८६ हजार ६१० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शुक्रवारी (दि.१५) कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र उर्फ चंद्र्या रावसाहेब पिंपळे (रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा), विश्वनाथ उर्फ पिंपळे (रा.संजयनगर, मुकुंदवाडी ), सुनिल शिवाजी पवार (रा.कंधार, ता.करमाळा,जि.सोलापुर), राम अशोक गावंडे (रा.साईनगर, गारखेडा), सिध्देश्वर नारायण घायाळ (रा.कामगार कॉलनी, चिकलठाणा) अशी गांजाची तस्करी करणाऱ्यांची नावे आहेत. कारमधुन गांजाची तस्करी होत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक मिरा लाड, मांन्टे, गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार सतीश जाधव, किरण गावंडे, धर्मा गायकवाड, नितीन देशमुख, एमआयडीसी सिडकोचे पोलिस अंमलदार बोर्डे, राठोड, जमधडे,पवार, जागरवाल आदींच्या पथकाने बीड बायपासवरील बकाल वस्ती रेल्वेगेट क्रमांक ५७ येथे सापळा रचून कार क्रमांक (एमएच-२०-बीवाय-१९५४) अडवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास ५७ किलो ३८२ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!