Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नशेत ७५ हजाराची बॅग विसरल्यावर केला चोरीचा बनाव पुंडलिकनगर पोलिसांमुळे प्रकरण चव्हाट्यावर

Spread the love

औरंंगाबाद : पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीतील एका उद्याणातून ७५ हजार रोख असलेली बॅग लंबविल्याची तक्रार एका तरुणाने केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून वस्तूस्थिती पडताळली असता तरुणाने दिलेली तक्रार ही खोटी असल्याचे समोर आले. हा प्रकार मंगळवारी (दि.१२) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसा, सचिन बबन मस्के (वय २०, रा.सावरगाव मस्के ता.जाफ्राबाद, ज़ि जालना) या तरुणाने पुडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली की, तो एन ४ येथील दर्पण गार्डन येथे गेला होता. त्याला झोप लागली असता चोरट्यानी त्याच्याजवळील ७५ हजार रोख रक्कम ठेवलेली बॅग लंपास केली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळावर पथक पाठविले. पथकाने परिसर पिंजून काढण्यासह या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता उद्यानात प्रवेश करतांना आणि रस्त्याने जातांना तरुणाकडे कोणतेही बॅग नसल्याचे दिसून आले.

पोलिसांनी, सचिन म्हस्के याला ताब्यात घेवून उलट चौकशी केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या जवळील बॅग करमाड येथील एका बारमध्ये विसरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी बार मालकाशी संपर्क केला असता बारमालकाने बॅग बारमध्ये मिळाली असल्याचे सांगितले.

आमदाराचा पीए देखील बनावट…

उलट तपासणी होत असल्याचे लक्षात येताच सचिन मस्के या तरुणाने त्याचा मोबाईल पोलीस अधिकाऱ्याला दिला. मोबाईलवर बोलणाऱ्या व्याक्तीने आपण भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांचा पीए गव्हाणे बोलत असल्याचे सांगीतले. शिवय तातडीने त्याची बॅग शोधा, त्याला त्रास देऊ नका असे फर्मान सोडले. नंतर एपीआय सोनवणे यांनी खात्री केली असता आमदार संतोष दानवे यांचा पीए त्यांना बोललाच नसल्याचे समोर आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!