Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खंडपीठाने नोंदवले निरीक्षण; पेराॅलवर सुटलेले कैदी दुसर्‍या गुन्ह्याची करतात तयारी

Spread the love

औरंगाबाद – पेराॅलवर सुटलेले कैदी बाहेर आल्यानंतर दुसर्‍या गुन्ह्याची तयारी करतात.म्हणून त्यांना सबंधित पोलिस ठाण्यात दर महिन्याच्या ७आणि २१तारखेला हजरी देणे बंधनकारक करावे.असे निरीक्षण खंडपीठाचे न्या.रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. डेबडवार यांच्या खंडपीठाने हर्सूल कारागृहात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पेराॅलवर सोडण्याचे आदेश देतांना नोंदवले.

पाच वर्षांपासुन उदगीरच्या खुन प्रकरणात हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भौगत असलेले भानुदास(६५) आणिअंतेश्वर (२६) देवकाते यांनी कोरोना काळात पेराॅलसाठी निघालेल्या नव्या अध्यादेशानुसार पेराॅलवर सुटण्यासाठी खंडपीठात धाव घेतली होती. नव्या ८मे २०च्या अध्यादेशानुसार तीन वर्षांपासून शिक्षा भोगंत असलेल्या कैद्यांना कोविड काळात संसर्ग होऊ नये म्हणून इमर्जन्सी पेराॅलवर सोडण्यात यावे.त्यानुसार देवकाते पिता पुत्राला पेराॅलवर सोडतांना खंडपीठाने निरीक्षण नोंदवले.

निरीक्षणात खंडपीठाने आणखी नमूद केले आहे की, पेराॅलवर सुटलेल्या कैद्यांना पोलिसांनी दर महिन्याच्या ७ आणि २१ या तारखांना संबंधित पोलिस ठाण्यात हजरी लावणे बंधनकारक करावे.त्याच प्रमाणे हर्सूल कारागृहात सध्या शिक्षा भोगत असलेले कैद्यांची संख्या कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधले.

या प्रकरणी याचिका कर्त्यातर्फे अॅड.प्रशांत नागरगोजे आणि अॅड विशांत कदम यांनी काम पाहिले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!