Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांना करावा लागला दशक्रिया विधी

Spread the love

औरंगाबाद – वेदांतनगर पोलिसांनी चिकाटी दाखवत सायबर पोलिसांच्या मदतीने दशक्रिया विधीत सहभाग नोंदवून ३०लाखांची फसवणूक करणार्‍या भामट्या संस्थाचालकाला वर्षाच्या सुरवातीला १जानेवारी रोजी बेड्या ठोकल्या.
नगर जिल्ह्यातील चकलांब्याच्या पुण्यश्र्लोक फाऊंडेशन चा अध्यक्ष संतोष बबन गंडे असे अटक आरोपीचे नाव आहे.
संतोष गंडे ने २०१७साली संतोष कुमार पाटील हे बनावट नाव धारण करुन एचडीएफसी बॅंकेला १४लाख ५० हजाराला तर एका खाजगी कंपनीच्या एच.आर. मॅनेजरला १४लाखांना गंडवून धूम ठोकली होती. २५नोव्हेंबर २०१९ रोजी या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गंडे सोबंतच एका एजंट च्या मदतीने एच.डी.एफ.सी. बॅंकेला १६जणांनी विविध प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या मदतीने जवळपास १कोटींचा गंडा घातला होता. संतोष गंडे हा १७वा आरोपी दशक्रिया विधीला पैठणला येताच वेदांतनगर पोलिसांनि दशक्रिया विधी पार पाडण्याचे नाटक करंत गंडे ला बेड्या ठोकल्या.
संतोष गंडे ने संतोषकुमार पाटील हे नाव धारण करंत एचडीएफसी बॅंकेत २०१७साली १४ लाख ५० हजार रु.च्या कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता.शहरात घर किरायाने घेत बनावट नावाने वीजमीटर घेतले व कर्ज प्रकरण मंजूर करुन कर्ज उचलले व फरार झाला तेंव्हा पासुन पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान गंडेने वाळूज औद्योगिक परिसरातील घर विक्रीसाठी मेटालिस्ट फोर्जिन कंपनीच्या एच.आर. मॅनेजरला २०१८ साली गळ घातली व इसारपावती पोटी १४लाख रु.घेतले होते. पण कोलतेंना घर व्यवहारात अडथळे दिसू लागताच त्यांनी गंडे ला रुपये परंत मागितले.तेंव्हा गंडे ने बोगस चेक देत कोलतेंना फसवले.तसैच चेतन छाजेड नावाच्या व्यापार्‍याला १लाख ७६ हजार रु.फसवल्या प्रकरणी कोर्टाने गंडेच्या नावाचे वाॅरंट बजावले होते. पण गंडे मिळतंच नव्हता. पण खबर्‍याच्या मदतीने पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी गंडेचा जुना फोटो व मोबाईल नंबर मिळवला होता. गंडे १जानेवारी २०२१ रोजी पैठणला दशक्रिया विधीसाठी येत असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी गंडेचे मोबाईल लोकेशन वेदांतनगर पोलिसांना वेळोवेळी अपडेट केले. त्यानुसार पीएसआय प्रमोद देवकाते एएसआय सय्यद हनीफ, पोलिस कर्मचारी सोळंके, संपाळ या पथकाने पैठणला धडक दिली.पैठण पोलिसांच्या मदतीने दशक्रिया विधी च्या ठिकाणी दशक्रिया करण्यासाठी वेशांतर करुन पोहोचले. तेवढ्यात गंडे बुलेटवर नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी घाटावर पोहोचला. बुलेटवरुन उतरताच गंडे घाटावर दशक्रिया विधीसाठी टपकला. तेवढ्यात पोलिसांनी गंडेच्या बुलेट चे प्लग काढून घेतले. पण गंडेला संशय आल्यामुळे तो विधी अर्धवट टाकून बुलेट सुरु करुन पळंत असतांनाच पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. गंडेने प्लग नसतांना ही बुलेट कशी सुरु केली हा प्रश्न पोलिसांनी विचारताच त्याने बुलेट डबल प्लगवर चालवत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
वरील प्रकरणात पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी वेदांतनगर पोलिस आणि सायबर पोलिस ठाण्याने तपासात दाखवलेल्या चिकाटी बद्दल कौतूक करंत दोन्ही पोलिस ठाण्यांच्या नावाची रिवाॅर्डसाठी पोलिसआयुक्तांकडे मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!