Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या दमाचे ११चोर १कोटी ३लाख २०हजारांच्या मुद्देमालासहित जेरबंद

Spread the love

हायवा ट्रक चोरी करणारी ११जणांची आंतरराज्यीय टोळी ग्रामीण गुन्हेशाखेने १कोटी ३लाख २० हजारांच्या मुद्देमालासह जेरबंद केली. या टोळीने चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

जप्त केलेल्या मुद्देमालात चिकलठाणा परमेश्वर उर्फ हवा सखाराम वाघ (२७) रा. एन१३हडको, सोमनाथ उर्फ सोन्या सुरेश घोडके (२८) रा. पिंप्रीराजा, संतोष उर्फ बकासुर ज्ञानेश्वर थोरात रा. वाघलगाव फुलंब्री, विजय जगन्नाथ धुळे (२०) रा. चित्तेपिंपळगाव, जीवन माणिक कराड (२८) रा.पिराचीवाडी ता.केज , चिन सुभाष बडे(३०) रा.बीड जिल्हा, गणपत शंकर जायभाय (४५) रा. अंबड तालुका,ज्ञानेश्वर सर्जेराव दहिफळे (३०) रा.पाथर्डी तालुका, राजेंद्र शंकर sदेवकर (४०) रा.देवळाली नाशिक, सोपान प्रभाकर मोरे (३६) रा.बीड जिल्हा, राहुल श्रीमंत दुर्लेकर (२६) रा. उत्तर सोलापूर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वरील आरोपींपैकी हवा, सोन्या संतोष आणि विजय हे चौघे जीवन कराड याला हायवा उभी असलेले ठिकाण कळवायचे व रात्री कराड आणि त्याचे साथीदार हायवा लंपास करायचे हायवा उभे असलेले ठिकाण कळवण्यासाठी जीवन कराड औरंगाबादच्या चोरट्यांना प्रति ट्रक एक ते दीड लाख रु. देत होता. ही मोडस आॅपरेंडी खबर्‍याकडून पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना कळाल्या नंतर फुंदे यांनी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशावरुन वेगवेगळी पथके तयार करुन टोळीचा माग काढला. व शनिवारी वरील चोरट्यांना ८१लाखांच्या तीन हायवा, २०लाख रुपयांच्या तीन कार, दीड लाख रु.च्या दोन मोटरसायकल, ७०हजार रु,चे मोबाईल हॅंडसेट असा एकूण १कोटी ३लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळक्या कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वरील कारवाईत पीएसआय संदीपप सोळंके, गणेश राऊत, एएसआय वसंत लटपटे,पोलिस कर्मचारी धीरज भालेराव, विक्रम देशमुख,नरेंद्र खंदारे, प्रमोद खांडेभराड यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!