Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तरुणीला मारहाण

Spread the love

पाच दुचाकी शहरातून लंपास

दुचाकी चोरांचा औरंगाबाद शहरात धुमाकूळ सुरूच असून, विविध भागातून पुन्हा पाच दुचाकी चोरांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटना आठवडाभरात घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना सिडको, एन-५, कॅनॉट भागात घडली. निर्दोष जयकुमार परतवार (५८, रा. आयनॉक्स तापडीयाच्या पाठीमागे, सेक्टर टाऊन सेंटर सी-३) हे सेवानिवृत्त आहे. ४ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास परतवार हे कॅनॉट प्लेस भागातील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-२०-डीएक्स-८१०९) बँकेच्या गेटसमोर उभी केली होती. बँकेतील काम आटोपून दुपारी अडीचच्या सुमारास ते बाहेर आले. तोपर्यंत चोराने त्यांची दुचाकी लांबवली होती.

दुसरी घटना शहागंज भागातील बनेमिया दर्गा परिसरात घडली. कारपेंटर सय्यद समीर सय्यद युसूफ (२९, रा. माणिकनगर, गट क्र. ३, नारेगाव) यांनी ६ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास शहागंजातील हॉटेल जमजम समोरील बनेमिया दर्गाजवळ दुचाकी (एमएच-२०-ईव्ही-०३९३) उभी केली होती. त्यांची दुचाकी पाऊण तासाच्या अंतरावर चोराने लांबवली.

तर तिसरी घटना उस्मानपुरा भागातील गोपाल टी जवळ घडली. शेतकरी अमजद उस्मान पठाण (४२, रा. बालानगर, ता. पैठण) हे ५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात आले होते. त्यांनी गोपाल टी जवळ त्यांची दुचाकी (एमएच-२०-एफजे-७७१०) उभी केली होती. कामानिमित्त ते बाहेर गेल्याचे पाहून चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबवली.

तसेच चौथी घटना अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोर घडली. इमरान खान हुसेन खान (२८, रा. पटेलनगर, नारेगाव) हे ५ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास अदालत रोडसमोरील आयसीआयसीआय बँकेत कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-२०-सीसी-४२२३) बँकेसमोरील पार्किंगमध्ये उभी होती. चोराने संधी साधून अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी लंपास केली.

याशिवाय वाळुज, लांजी रोड येथील निसार हमीद पठाण (३३, रा. लांजी रोड) यांनी ६ जानेवारी रोजी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-एफडी-९१०१) उभी केली होती. चोराने मध्यरात्री त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली.

गेस्ट हाऊस फोडून एलईडी लंपास

वाळुज एमआयडीसी भागातील कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये शिरुन चोराने दोन एलईडी लंपास केले. ही घटना ६ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. रामवीरसिंग गजेसिंग (५७, रा. बजाज विहार, ओअ‍ॅसिस चौक, वाळुज) हे एका कंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दुपारी दोनच्या सुमारास स्वच्छता कर्मचारी सुजीत दास याने फोनवरुन माहिती देत गेस्ट हाऊस, ए-९ मधील खोली क्र. ९०४ च्या दरवाजाचे कुलूप तोडून चोराने दोन एलईडी टिव्ही असा २४ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे सांगितले. त्यावरुन एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिव्ह इनमधील तरुणीला मारहाण

जेवण वाढायला उशीर होत असल्याच्या कारणावरुन लव्ह इनमध्ये राहणा-या तरुणीला जोडीदाराने शिवीगाळ व बेदम मारहाण केली. ही घटना ६ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडली. शंकर पाखरे (२८, रा. मुकुंदवाडी) हा एका तरुणीसोबत मागील चार वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. दरम्यान, ६ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने एका तरुणीला जेवण वाढण्यास सांगितले. त्यावर तरुणीने थोडे थांब असे म्हणताच पाखरेने तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तिच्या मुलीला देखील जबर मारहाण केल्याने तिच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला जमादार पवार करत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!