Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : सावधान !! कोरोना लसीबद्दल कुठलेच अ‍ॅप उपलब्ध नाही , फेक अ‍ॅपपासून सावध राहा , केंद्राकडून खुलासा

Spread the love

देशात  केंद्र सरकारकडून  कोरोनाच्या  लसीकरणाची मोहीम सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरु झालेल्या असल्या तरी लस नोंदणीसाठी अद्याप कोणतेही अ‍ॅप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे कोविन नावाच्या कुठल्याही अ‍ॅपला बळी पडू नका आणि या अॅपवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. अशा प्रकराच्या कुठल्याही प्रकारचे अ‍ॅप लाँच करण्यापूर्वी पुरेशी माहिती दिली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण यापूर्वीही  आरोग्य मंत्रालयाने  को-विन नावाच्या काही अ‍ॅप्सबद्दल मोठा इशारा दिला आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या घोषणांनंतर लसीच्या नोंदणीसाठी गुगल प्ले स्टोअरवरून को-विन अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल असं बोललं जातं होतं. नोंदणीनंतर लस घेण्यासाठी कुठे जायचं आहे आणि शिबिराची माहिती अॅपवरून दिली जाईल, असं सांगितलं जात होतं. पण आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी सावधानतेचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर अॅपवरून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. अ‍ॅप संबंधित अनेक प्रकारचे मिम देखील पाहिले गेले आहेत.

देशात करोनावरील लसीकरण मोहीम ही पुढच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले होतं. करोनावरील लसीला मंजुरी दिल्यानंतर दहा दिवसांत लसीकरण मोहीम सुरू होऊ शकेल, असं ते म्हणाले होते. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर देश आता लसीकरणाची आतुरतेने वाट पाहत आहे. लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे गुरुवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. लस वितरणासंदर्भात राज्यांच्या तयारीचा आढावा घेतील. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२.३० वाजता होईल. या बैठकीत लसीकरणाच्या मूलभूत तयारींचा आढावा घेण्यात येईल.

मुंबई पोलिसांचाही सतर्कतेचा इशारा 

कोरोना वॅक्सिन साठी आलेला फोन उचलू नका. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार नंतर सांगणार ओ टी पी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा. सावध राहा आणि काळजी घ्या.
मुंबई पोलीस( महाराष्ट्र )

आपलं सरकार

Click to listen highlighted text!