Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात ढगाळ वातावरणामुळे हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज…

Spread the love

गेल्या काही दिवसंपासून राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील काही दिवसांत, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
https:/Whether/twitter.com/Hosalikar_KS/status/1345799131294433281?s=19
àउत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच दिल्लीतही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातही ६ ते ७ जानेवारी रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच, काल मुंबईत सांताक्रुझ परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे.


उत्तर भारतात गेल्या आठवड्यात थंडीची लाट आली होती, त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला. मात्र, गेल्या दोन दिवसांत उत्तरेकडील राज्यात हवेची चक्राकार स्थिती असून, काही भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात बाष्प येत असल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. पुढील चार दिवस प्रतिकूल वातावरणामुळे संपूर्ण राज्यातील तापमानात कमी अधिक प्रमाणात वाढ होणार आहे. येत्या ६ आणि ७ जानेवारीला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असून, विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!