Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : Maharashtra : राज्यात आढळले ३५२४ नवे रुग्ण , ४२७९ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात   ३ हजार ५२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून  ४ हजार २७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजार ८४ इतकी असून आतापर्यंत राज्यात या संसर्गाने ४९ हजार ५८० जणांचा बळी घेतला आहे.

दरम्यान राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कमी जास्त होत आहे. गुरुवारच्या तुलनेत आज अधिक रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. राज्यात आज ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ४९ हजार ५८० इतका झाला आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार १२५ मृत्यू एकट्या मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ३२ हजार ८२५ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ( Recovery Rate) ९४.६९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी २८ लाख २३ हजार ८३४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १९ लाख ३५ हजार ६३६ (१५.०९ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ६९ हजार ३४८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ३१४ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

राज्यात करोना रिकव्हरी रेट वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या करोनाच्या ५२ हजार ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार ५२५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात ही संख्या १० हजार २५४ व मुंबईत ८ हजार ९४३ इतकी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!