Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता भीमा कोरोगावला गर्दी न करण्याचे आवाहन

Spread the love

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सामाजिक न्यायमंत्री   धनंजय मुंडे हे सकाळी 6 ते 7 या वेळात अभिवादन करणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत.

शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या प्रेरणास्थळी अभिवादनासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आदर्श निर्माण करावा, असे मत श्री. मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!