AurangabadCrimeUpdate : एटीमएमधे फसवणारा भामटा नागरिकांनी केला पोलिसांच्या हवाली

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद- सूतगिरणी परिसरातील एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटर काल २९/१२ रोजी दुपारी २वा. एटीएम पिन जनरेट करणार्‍या तरुणाला फसवणार्‍या दोन भामट्यापैकी एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

गौरव ओमप्रकाश पांडे(३१) रा.श्यामनगर कानपूर उत्तरप्रदेश असे अटक आरोपीचे नाव आहे.पांडे आणि त्याच्या साथीदाराने गारखेडा परिसरातील विजय दामोदर साळुंखे(२८) यांना दहा हजार रुपयांना गंडा घातला. साळुंखे हे एसबीआयच्या नव्या एटीएम ला अॅक्टीवेट करण्यासाठी पिन जनरेट करंत होते. त्याच वेळेस आरोपीपांडे सोबत एका तरुणाने साळुंखे यांचे नवे एटीएम अदलाबदल करुन साळुंखे यांचे १०हजार रु. लंपास केले. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पांडे एक तासाने सूतगिरणीचौकात दिसल्यानंतर साळुंखे यांनी आरडाओरड करुन नागरिकांच्या मदतीने आरोपी पांडे ला पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाछाली पीएसआय भारत पाचोळे करंत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार