Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच , १० वी , १२ वीच्या पुरवणी परीक्षा मात्र वेळेवरच

Royalty-free stock illustration of an African-American little boy with dark curly hair, holding his backpack with one hand and staring at his watch, sweating with anxiety as he is late for school.

Spread the love

मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि नव्या कोरोनाची भीती लक्षात घेता  मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच राहतील असा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!