Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ , राज्य शासनाचा मोठा निर्णय

Spread the love

घोषित कार्यक्रमाप्रमाणे येत्या १५ जानेवारीला राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक होत आहेत. दरम्यान मागास संवर्गातील उमेदवारांच्या जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या जास्त असल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडथळे येत आहेत. उमेदवारांची हि अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान उद्या दि . ३० डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत.त्याच बरोबर अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश देत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेनुसार पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल आणि खिडकी वाढणवण्यात यावी. कार्यालय पूर्ण वेळ तसेच सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावेत, अशा सूचना देखील जात पडताळणी समित्यांना देण्यात आल्या आहेत.

घोषित कार्यक्रमानुसार राज्यात १४, २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या १४२३४ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदानहोत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर १८ जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम…

-15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध । 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

-31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी । -4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

-15 जानेवारी मतदान । -18 जानेवारी मतमोजणी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!