Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsupdate : वर्षा राऊत यांची विनंती मान्य करीत ईडीने चौकशीसाठी दिली नवी तारीख

Spread the love

खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावत  २९ डिसेंबर रोजी अर्थात आजच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती मान्य करीत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवून आता ५ जानेवारी पूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

ज्या  PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.

 

या प्रकरणात संजय राऊत यांचे बंधु प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची यापूर्वी चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे बाकी असल्याचं ED च्या समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. खा. संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेण्याच्या प्रयत्नात आहेत.ईडीकडून त्यांच्या पत्नीला तीन नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांची टीका 

दरम्यान या विषयावरून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईडीच्या या कारवाईला राजकीय कारवाई संबोधून  भाजपवर टीका केली होती. दरम्यान या प्रकरणावर  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही  संताप व्यक्त केला आहे. “हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!