Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ब्रिटनच्या १२ प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मुंबई हादरली

Spread the love

ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला असून या करोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवा करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सर्व प्रशासकिय यंत्रणांही सावध झाल्या असून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानांवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात ब्रिटनहून मुंबईत परतलेल्या प्रावशांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ये आज ब्रिटनमधून मुंबईत आलेले १२ प्रवासी पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली आहे.

‘२५ नोव्हेंबर पासून ते आजच्या तारखेपर्यंत जे प्रवासी मुंबईत आले आहेत त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांना हॉटेलमध्येच क्वारंटाइन करण्यात येत आहेत. या पूर्ण रुग्णांमध्ये १२ जणं करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत,’ असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. ‘पॉझिटिव्ह आलेल्या १२ रुग्णांच्या अहवालांचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या लॅबच्या अहवालानंतरच त्या रुग्णांना करोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे,’ असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ३१ डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोनाचा धोका अधिक पसरु नये यासाठी काकाणी यांनी नागरिकांना अवाहन केले, ‘सार्वजनिक ठिकाणी व चौपाट्यांवर महापालिका आणि मुंबई पोलिसांचे पथक तैनात असतील. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, असे नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत,’अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!