Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात ४५०१ हजार रुग्णांना डिस्चार्ज , ५० जणांचा मृत्यू , पुण्याने चिंता वाढवल्या

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात २ हजार ४९८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ४ हजार ५०१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४. ४ टक्के इतके झाले आहे. राज्यात आणखी ५० जणांचा करोनानं मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना संसर्गानं ४९ हजार ३०५ रुग्ण दगावले आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या २. ५७ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात राज्यात सध्या ४ लाख ५२ हजार ५३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५७ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण असून पुणे जिल्ह्यात १४ हजार २३१ सर्वाधिक रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात १० हजार ९७९ व मुंबईत ८ हजार ८६२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनारुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यातली रुग्णसंख्या देशात सर्वाधिक आहे.  त्यातच आता कोरोनाव्हायरसचं नवं स्वरूप उजेडात आलं आहे आणि ब्रिटनमध्ये त्याचे रुग्ण सापडले आहेत. पुण्याचा धोका आणखी वाढण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे इंग्लंडमधून पुण्यात परत आलेल्यांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. मात्र त्यातील १०६ जणांचा पत्ताच सापडत नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना तपासासाठी पत्र दिलं आहे.

दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. हा नवा विषाणू आधीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. याच इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी पुन्हा एकदा २ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय औरंगाबाद , कल्याण येथील कोरोनाबाधितांचा अंतिम अहवाल अहवाल अद्याप प्राप्त  न झाल्याने चिंता वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!