Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : पत्नीच्या ईडी चौकशीच्या वृत्तावर खा . संजय राऊत यांनी दिली हि प्रतिक्रिया ….

Spread the love

ईडीची चौकशी हा विरोधकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे . गेल्या काही दिवसनपासून शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांचे आणि त्यांच्या पुत्रांचे ईडी चौकशी प्रकरण चालू असताना  भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीची चर्चा संपत नाही तोच आता ईडीने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  यांच्या पत्नी वर्षा राऊत  यांना नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणात हि चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.  या प्रकरणी ईडीने २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स जरी केले आहेत.

दरम्यान ईडी समन्स बाबतीत मला कल्पना नाही, मला माहीत नाही. ईडी समन्स आलं असेल तर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देईन,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया’, असे म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

पीएमसी बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या सहकार्याने वर्षा राऊत यांनी ५० लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असल्याचे  सांगण्यात येत आहे.  मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत या घोटाळ्याची चौकशी ईडी  करत आहे. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर २०१९ ला ईडीकडे ही चौकशी देण्यात आली होती. पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी बँक) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ हून अधिक जणांना अटक केलीय. ‘पीएमसी’च्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती पाहून तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने प्रथम ‘एचडीआयएल’चे कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांना अटक केली. यानंतरही अटकेचा हा सिलसिला सुरू आहे.

 

दरम्यान शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही ईडीच्या चौकशीला हजर राहण्यासाठी जळगावहून रवाना झाले आहेत. ईडीकडून करण्यात येत असलेल्या या चौकशीचा काँग्रेसने निषेध केला आहे. केंद्रातील सत्तेत असलेल्या भाजपकडून सूडाचं राजकारण सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. तर  संजय राऊत यांनी ईडी चौकशी प्रकरणावर वर ट्विट करून प्रत्युत्तर देताना  ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया’, या हिंदी चित्रपट गीताच्या ओळी वापरल्या आहेत.

भज नेत्यांचा मोके पे चौका

खा. राऊत यांच्या ईडी चौकशीची बातमी येताच , भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपली खोचक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं.  दिली आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!