Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात ३ हजार ३१४ रुग्णांची वाढ, २ हजार १२४ जणांना डिस्चार्ज तर  ६६ जणांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात रविवारी नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली असून  दिवसभरात ३ हजार ३१४ रुग्णांची भर पडली आहे. २ हजार १२४ जणांनी कोरोनावर मात केली तर  ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आजपर्यंत १,२५,०२,५५४ प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले  असून  त्यापैकी आतापर्यंत राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख १९ हजार ५५० झाली असून १८ लाख ९ हजार ९४८ जणांनी कोरोनावर मात केली असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर Recovery Rate चांगला असून तो ९४.२९ टक्केंवर वर गेला असून सध्या राज्यातील मृत्युदर हा २.५७ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ४,५७,३८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत; तर ३,३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात ५९ हजार २१४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

ब्रिटनमधून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची पालिकेने करोना चाचणी सुरू केली आहे. त्यात एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला आहे. या प्रवाशाचा तपासणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी मुंबईतून पुणे येथील राष्ट्रीय संसर्गजन्य संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत जे प्रवासी ब्रिटनमधून महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची यादी राज्य सरकारने स्थानिक जिल्हा, पालिका प्रशासनांना पाठविली आहे. या प्रवाशांच्या करोना चाचण्या, त्यांच्यावर ठेवायची देखरेख आणि प्रवासी करोनाबाधित आढळून आला तर घ्यावयाची दक्षता याविषयीच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!