Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : रजनीकांत हैद्राबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल

Spread the love

प्रसिद्ध अभिनेते  रजनीकांत यांची ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अचानक प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना  हैद्राबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना  रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना इतर काही लक्षणं नाहीत असंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच ते शुटिंग करत असलेल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी आठ जणांना करोनाची लागण झाली. त्यानंतर यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केलं होतं.  तसेच खबरदारीचा उपाय म्हणून रजनीकांत यांचीही करोना चाचणी करण्यात आली पण ती निगेटिव्ह आल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. विशष म्हणजे रजनीकांत ३१  डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ‘अन्नाथे’चं चित्रीकरण जवळपास नऊ महिन्यांसाठी थांबवण्यात आलं होतं. यानंतर १४ डिसेंबरपासून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली होती. परंतु क्रूमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा चित्रीकरण रोखण्यात आलं. दरम्यान अन्नाथे या चित्रपटाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!