Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : दारूची तस्करी करणारे दोघे गजाआड , राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : आलिशान इनोव्हा कारमधुन अवैधरित्या देशी दारूची तस्करी करणा-या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई गुरूवारी (दि.२४) दुपारी पिंपळगाव वळण ते पिशोर रोडवरील डोंगरगाव चौफुली  येथे करण्यात आली.

भाऊलाल देवचंद ज-हाडे उर्फ  चिंग्या (वय ३२), सुरेश विल्सन घुले (वय १९) दोघे राहणार नांदी, ता.अंबड, जि.जालना असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या मद्यतस्करांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपाआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम.एस.पतंगे, सहनिरीक्षक ए.जे. कुरैशी, ए.एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.ए.महिंद्रकर, एस.आर.वाघचौरे, जी.बी.इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी.डी.पुरी, ए.जी.शेंदरकर, जी.एन.नागवे, जवान एस.एस.गुंजाळे, ढाले, ए.के.जायभाय, व्ही.जी. चव्हाण, वाय.पी.कल्याणकर आदींच्या पथकाने पिंपळगाव वळण ते पिशोर रोडवरील डोंगरगाव चौफुली  येथे सापळा रचून कार क्रमांक (एमएच-१२-केजे-३९६६) अडवली. पथकाने कारची झडती घेतली असता कारमध्ये १ हजार ५६ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पथकाने कारसह १० लाख ६७ हजार ०९२ रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा परिषदेचा लाचखोर कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : तक्रारदार शिक्षकाच्या सेवा-पुस्तिकेची वेतन पडताळणी करण्यासाठी १ हजार रूपयांची लाच घेणा-या जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि.२४) रंगेहाथ पकडले. रामू सोनाजी दाभाडे (वय ३८) असे लाचखोर कनिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या वतीने वैजापूर येथील पंचायत समितीच्या आवारात वेतन पडताळणीसाठी शिबीराचे आयोजन २१ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. या शिबिरात तक्रारदार शिक्षकाच्या सेवापुस्तिकेची पडताळणी करून वेतन निश्चिती करण्यासाठी रामू दाभाडे यांनी १ हजार रूपयांची लाच मागीतली होती. तक्रारदार शेतक-यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ‍ॅन्टी करप्शन विभाकाकडे तक्रार दिली होती. अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी कुलकर्णी, पोलिस अंमलदार भिमराज जीवडे, प्रकाश घुगर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल आदींनी सापळा रचून लाचखोर रामू दाभाडे यास रंगेहाथ पकडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!