WorldNewsUpdate : या देशात अल्पवयीन मुला – मुलींशी संबंध ठेवणाऱ्या प्रौढाला होईल आता ४० वर्षाची शिक्षा

Spread the love

फ़िलीपाईन्स सरकारने आता १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी किंवा मुलाशी लैंगिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरवला जाईल आणि दोषी व्यक्तीला ४० वर्षांची शिक्षा होईल असा कांतिकारी कायदा करण्याची घोषणा केली असल्याचे वृत्त आहे. इतकेच काय हा कायदा लागू झाल्यास  संमतीने  लैंगिक संबंध ठेवल्याचा युक्तिवाद करण्यासही या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान “स्वीटहार्ट क्लॉज” अंतर्गत मात्र लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांची वये समान असतील किंवा दोघांत फार अंतर नसेल तर त्या परिस्थितीत दोघांनाही शिक्षा न करता अशा मुलांना बालसुधारगृहात पाठवलं जाईल अशी तरतूद ठेवण्यात आली आहे. मुलांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर फ़िलीपाईन्स सरकारने हा निर्णय घेतला आहे.

न्यूज -१८ लोकमतने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे ,कि  जगभरात परस्पर सहमतीनं लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कायदेशीर परवानगी असण्याचं वय वेगवेगळं आहे. भारतात हे वय १८ वर्षे आहे, तर जर्मनी आणि  इटलीत हे वय १४ वर्षे आहे, मात्र संबंध ठेवणाऱ्यांच्या वयातील अंतर खूप नसले पाहिजे अशी अट आहे. अन्यथा तो बलात्काराचा  गुन्हा ठरू शकतो. नायजेरीयात परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवण्याचं वय ११ वर्षे आहे. मात्र आतापर्यंत फिलीपाईन्स  हा असा देश होता कि , जेथे वयाच्या १२ व्या वर्षी लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी होती. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार फिलीपाईन्समध्ये १३-१४ वर्षाच्या मुली आई बनण्याचं प्रमाण सर्वाधिक असून २०१७ मध्ये तिथल्या अधिकृत संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दररोज ५३८ अल्पवयीन मुली बाळांना जन्म देतात. या देशात कोवळ्या वयातील मुलींच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे.

फिलीपाईन्समध्ये असे आधी घडत नव्हते

दरम्यान फिलीपाईन्स मध्ये १९८७ मध्ये अवघ्या अकरा वर्षांची एक मुलगी लैंगिक संबंधांदरम्यान झालेल्या जखमांमुळे मृत्युमुखी पडल्यानंतर हा अल्प वयाचा मुद्दा चर्चेत आला, पण घडलं काहीही नाही. रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या या मुलीनं आपलं वय १२ सांगितल्याचा बनाव तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या ऑस्ट्रियन डॉक्टरनं केला. मानवाधिकार संस्थांनी याबाबत आवाज उठवल्यावर या डॉक्टरला देशातून हाकलून देण्यात आलं मात्र  त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही आणि त्यावेळी वयोमर्यादा बदलण्याबाबत कोणता निर्णयही झाला नाही. अन्य देशांमध्ये इतक्या लहान वयाच्या मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवणं बेकायदेशीर असल्यानं हा बलात्काराचा गुन्हा ठरला असता आणि त्या डॉक्टरला शिक्षा झाली असती, पण फिलीपाईन्समध्ये असं काहीही घडलं नाही. त्यानंतर आजतागायत तिथं हजारो कोवळ्या वयातील मुली विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत. लैंगिक संबधादरम्यान होणाऱ्या जखमा आणि लहान वयातील गर्भारपण ही या लहान मुलींच्या मृत्यूची मुख्य कारणं आहेत.

या वृत्तानुसार फिलीपाईन्समध्ये पर्यटन व्यवसाय  हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळं तिथं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वयाच्या मर्यादेकडं  सरकारही  आतापर्यंत दुर्लक्ष करीत होते. फिलीपाईन्समध्ये  आता अनेक वर्षांनी इथल्या मुलींच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण बाल गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात आता लैंगिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा आता १२ वरून १६वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात हा  नवा कायदा येत आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.