Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात दिलासादायक स्थिती पण नव्या कोरोनामुळे काळजी घ्या , बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ

Spread the love

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने तत्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.  राज्यातील कोरोनाची आजची स्थिती दिलासादायक असली तरी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  गेल्या २४ तासात राज्यात नवीन बाधितांच्या तुलनेत आज दुपटीपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शिवाय दैनंदिन मृत्यूंचा आकडाही आज कमी झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या म्हणीनुसार राज्यात आज २ हजार ८३४ नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ६ हजार ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ८९ हजार ९५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ९४.२४ टक्के एवढे झाले आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६० हजारच्या खाली आली असून सध्या ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या आजाराने ४८ हजार ८०१ जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २१ लाख ५७ हजार ९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ९९ हजार ३५२ (१५.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ०४ हजार ९३८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई – ठाण्यातही बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

दरम्यान मुंबई महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ६९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ७०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट सध्या ९३ टक्के आहे. सध्या ७ हजार ७५४ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा दर ३५६ इतका झाला आहे. कोविड वाढीचा दर (१४ डिसेंबर ते २० डिसेंबर ) ०.२१ टक्के इतका आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यात आज ४३४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७२ टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत दोन लाख २९ हजार ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या चार हजार ३४७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात ३४९ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या दोन लाख ३९ हजार २८० इतकी झाली आहे. सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे पाच हजार ८८४ रुग्ण दगावले आहेत.

पुण्यात एकाच दिवसात १६३ रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात १६३ करोना बाधित रुग्ण आढळले. आज १ लाख ७६ हजार २२८ इतकी करोना रुग्णांची संख्या झाली आहे, तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५८१ मृतांची संख्या झाली आहे. त्याच दरम्यान २५२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ६६ हजार ५४९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १०३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ९८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५ हजार ४३६ वर पोहचली असून पैकी, ९१ हजार ९५४ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७४८ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!