Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात आढळले ३९९४ नवे रुग्ण , ४४६७ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात  ४ हजार ४६७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.१७ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ९९४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १९ लाख ९६ हजार ६२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८८ हजार ७६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३ हजार ८८६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ४ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ६० हजार ३५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील १८ लाख ८८ हजार ७६७ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ४८ तासांपैकी १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालवाधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे-९, यवतमाळ-२, अमरावती-१, औरंगाबाद-१, नागपूर-१, सातारा-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!