Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : हाथरसमधील “त्या ” पीडितेवर सामूहिक बलात्कारच झाला , सीबीआयकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

Spread the love

देशभर तीव्र पडसाद उमटलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर महिन्यात हि घटना घडल्यानंतर तीन महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. एनडीटीव्हीने याबाबत  वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गेल्या १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ३० सप्टेंबरला पीडितेच्या घराजवळ तिच्यावर परस्पर रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश  अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांकडून मात्र कुटुंबाच्या इच्छेनुसारच सर्व काही करण्यात आल्याचा दावा केला होता. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता.

दरम्यान मुख्य आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांना जेलमधून पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्याने आपण आणि आपल्या मित्रांना या प्रकरणात अडकवलं जात असून न्याय देण्याची मागणी केली होती. पीडितेची आई आणि भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा दावाही त्याने केला होता. पीडितेच्या कुटुंबाने हे आरोप फेटाळले होते. सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!