Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देश : आपल्या निर्णययावर पंतप्रधान मोदी ठाम , विरोधकांनाच जोडले हात तर राहुल गांधी यांचा मोदींना शेतकऱ्यांचे ऐकण्याचा सल्ला

Spread the love

गेल्या २१  दिवसांपासून रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलकडे दुर्लक्ष करीत त्यावर कुठलेही भाष्य केले नाही . दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करीत सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत देत  शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही दिली आणि सर्व राजकीय पक्षांना उद्धेशून ते म्हणाले कि , “मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे.” दरम्यान काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला,” असे म्हटले आहे.

नव्या कायद्यांचे समर्थन

एकीकडे नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारनं यावर समग्रपणे चर्चा केली आहे,” असं मोदी म्हणाले. या आधीही त्यांनी हीच भूमिका वाराणसी आणि गुजरातमध्ये बोलताना मंडळी होती परंतु त्यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. आजही पुन्हा हीच भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित करीत नव्या कायद्यांचे समर्थन केले.

आपल्या भाषणात मोदी म्हणाले कि , “आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणं ऐकली. जे कृषि मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचं सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली,” .

राहुल गांधी यांची टीका

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा  केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून  निशाणा साधला आहे. “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला,” अशी टीका करतानाच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कृषी कायद्यांसंदर्भात सल्लाही दिला आहे. पंतप्रधानांनी किसान संमेलनात संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकास्त्र सोडलं. “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदे मागे घ्या,” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!