IndiaNewsUpdate : देश : शेतकरी आंदोलन : पंतप्रधांनासाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा झालाय का ? आता न्यायालयीन लढाईचीही शेतकऱ्यांची तयारी

Advertisements
Advertisements
Spread the love

तब्बल २१ दिवस उलटून गेले तरी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब हरयाणातील शेतकऱ्यांचा असंतोष कमी झालेला नाही . या आंदोलकांशी केंद्रीय गृहमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी चर्चा केलेली असली तरी या चर्चेवर शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. हे जगजाहीर असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही . त्यामुळे त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला असल्याची टीका होत आहे. नव्या कृषी बिलावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट न बोलता प्रारंभी मोदी यांनी वाराणसीतून आणि गुजरातमध्ये जाऊन नव्या कृषी बिलांची भलावण केली पण मोदी आंदोलक शेतकऱ्यांना बोलत नाहीत. दरम्यान रस्त्यावरची लढाई चालू असतानाच आता आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी कायदेशीर लढाईसाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान २० ज्यांचे मृत्यू आणि एकाची आत्महत्या होऊनही शेतकऱ्यांचे हे आंदोलन  शांततेच्या मार्गाने केले जात आहे.

Advertisements

दरम्यान कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, यावर शेतकरी ठाम आहेत. तर  दिल्ली-एनसीआरमधील वाहतुकीच्या समस्येमुळे आंदोलक शेतकर्‍यांना हटवण्याची मागणीसाठी सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरील कायदेशीर लढाईसाठी शेतकऱ्यांनी दुष्यंत दवे, एस. एस. फुलका, कोलिन गोंसाल्विस यांच्यासह ४ ज्येष्ठ वकीलांचा पॅनेल तयार केला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढे काय करायचं? याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisements
Advertisements

आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना २० डिसेंबरला आंदरांजली

गुरुवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सांगण्यात आले कि , सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत. कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. आम्ही रोज आपल्या साथीदारांना गमवत आहोत. पण यामुळे आम्ही खचणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत ४ ज्येष्ठ वकीलांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर यावर निर्णय घेऊ. आतापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. चिल्ला सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांसह ४५० शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय आंदोलन करणाऱ्या ३५० महिलांवर लाठीमार करण्यात आला. आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना २० डिसेंबरला आंदरांजली वाहण्यात येईल आणि त्यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जाईल. झोपी गेलेल्या देशाला जागवण्यासाठी बाबा राम सिंह यांनी बलिदान दिले आहे, असं शेतकरी नेते शिवकुमार काका म्हणाले. त्यांनी बाबा राम सिंहची तुलना भगतसिंगाच्या बलिदानाशी केली.

सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी

एकीकडे हरयाणा आणि दिल्लीमधील टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी म्हटले आहे कि , सरकारशी पुढील चर्चेसाठी तयार आहेत.  पण अहंकाराला ठेच पोहोचू नये म्हणून सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आम्ही चर्चेच्या पुढील फेऱ्यांसाठी सज्ज आहोत. पण आपला अहंकार राखण्यासाठी सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेचं थेट प्रक्षेपण केलं पाहिजे, असं शेतकरी म्हणाले. दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी या विषयावर पंचायत बोलवण्याची घोषणा केली. ते ‘ पुढील दिशा काय असेल, यावर आम्ही पंचायतमध्ये चर्चा करू. आम्ही रस्ते अडवलेले नाहीत, पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. हा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ते बरोबर आहे. सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवल्यास आम्ही जाऊ. कायद्यात सुधारणा करण्याची सरकारी तयारी आहे. पण तिन्ही कायदे मागे घ्यावेत अशी आमची मागणी आहे, असं राकेश टिकैत म्हणाले.

आपलं सरकार