Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ४३०४ नव्या रुग्णांची नोंद , ९५ मृत्यू , ४६७८ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात ९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे असून ४ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसंच, ६१ हजार ४५४ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात उपचार घेत आहेत. राज्यातील करोना रुग्ण वाढीच्या संख्येत आज पुन्हा एकदा मोठा बदल दिसून आला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या व रुग्ण वाढीच्या आकड्यात फार मोठी तफावत नसली तरी आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील रिकव्हरी रेट टप्याटप्याने वाढत असल्यानं आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज राज्यात ४ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, राज्यातील रिकव्हरी रेट ९४. १ टक्के इतका झाला आहे. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत ४ हजार ३०४ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, आजपर्यंत एकूण १७,६९,८९७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आज ९५ करोनाबाधित दगावले आहेत. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५८ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१ ८, ७१, ४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८, ८०, ८९३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५, ०९, ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३, ९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!