Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : बस आणि गॅस टँकरच्या  भीषण अपघातात ९ जण ठार तर ३० जण

Spread the love

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात  बस आणि गॅस टँकरच्या  भीषण अपघातात ९ जण ठार तर ३० जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे .  बुधवारी सकाळी १०.०० वाजता धुक्यात समोरचं स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.  जखमींना तत्काळ नजीकच्या  रुग्णालयांत हलवण्यात आलं आहे.  मुरादाबाद -आगरा राष्ट्रीय महामार्गावर संभल जिल्ह्यात धनारी  पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्र यांनीही घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली . मृतांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत सात मृतदेह काढले आहेत. सदर गँस टँकर अलीगडकडून मुरादाबादकडे निघाला होता. तर रोडवेजची बस मुरादाबादकडून अलीगडकडे निघाली होती. या दरम्यान मानकपूरच्या मढय्यानजिक टँकर आणि बस धुक्यात समोरासमोर आले. वाहनांचा वेग जास्त असल्यानं आणि समोरचं अंधुक दिसल्यानं या दोन्ही वाहनांनी एकमेकांना धडक दिली. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर प्रशासनाकडूनही मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!