Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : गुगल , युट्युब , जी -मेल ठप्प झाल्याने युजर झाले होते त्रस्त , पूर्ववत होताहेत सेवा

Spread the love

जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगल आणि त्यांची  जीमेल , युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाल्यामुळे सर्व युजर त्रस्त झाले आहेत. अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत आहेत. तसंच यूट्युबवरही एरर येतो आहे आणि जीमेलवरही एरर येतो आहे. आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येतो आहे. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे. मात्र जगातल्या अनेक ठिकाणी गुगल, जीमेल आणि युट्यूब या तिन्हीवर अॅक्सेस करण्यास युजर्सना समस्या जाणवत आहेत. हा फटका नेमका कशामुळे बसला आहे? गुगल, युट्यूब आणि जीमेल का डाऊन झालं आहे याचे कारण स्पष्ट झालेले नाही. बातमी देत असताना या सेवा सुरळीत झाल्या आहेत.

दरम्यान युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला काही तास “something went wrong” हा मेसेज वाचावा लागला. जगातल्या काही देशांमध्येच हा त्रास सहन करावा लागला. युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला होता. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले होते. आज गुगलच्या सेवेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसला. जगभरातील गुगलची सेवा बाधित झाल्याचे दिसले आहे. सायंकाळी ५.२० वाजता गुगलची जीमेल सेवा आणि हँगआउट सह अनेक सेवामध्ये एरर (Gmail-Youtube Down) पेज पाहायला मिळाले. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही.

जीमेल डाउन झाल्याच्या  तक्रारी येताच, जीमेल, यूट्यूबने ट्विटरवर काही युजर्सला जीमेल अकाउंटमध्ये नेमकं काय झालं आहे, याबाबत माहिती देण्याचे  सांगितलं आहे. तसंच त्यांनी याबाबत मदत करत असल्याचंही म्हटलं आहे. जीमेलसह गुगलच्या अनेक ऍप्सचा सर्व्हर डाउन झाला होता तो आता सुरळीत होत आहे. गुगल ऍप्स डाउन होताच, ट्विटरवर जीमेल ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटर युजर्स #YouTubeDOWN, #googledown हॅशटॅग वापरून अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!