Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शेतकऱ्यांचं आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक , निर्मला सीतारामन यांची टीका

Spread the love

शेतकऱ्यांच्या आंदोलन विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आलं आहे असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी राजकारणासाठी त्यांचा फायदा करून घेणाऱ्यांपासून स्वतःला दूर टेवावं असं आवाहन त्यांनी  शेतकऱ्यांना केलं आहे. राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप करत सीतारामन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्य़ांचं आंदोलन सुरू आहे. नव्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. शेतकरी आंदोलबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांनाही चर्चा करून मार्ग काढू असं आवाहन केलं आहे. कृषी क्षेत्रात होत असलेले हे बदल शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिला. मात्र तरी या कायद्यामुळे  आपलं नुकसान होईल, असं वाटतं आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीदेखील शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली.

या आंदोलनावर टीका करताना निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या कि , “पुढील चर्चेसाठी सरकार सदैव तयार आहे. पण आता या आंदोलनात कृषीसंबंधी मुद्दे मागे पडत असल्याची भीती आहे. शेती आणि शेतकऱ्यांसंबंधी मुद्दे आता आंदोलनात मांडले जात नाही आहे. देशविरोधी घटकांना हवा दिली जाते आहे. शेतकरी आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे”  “केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहेत. पुन्हा मागे जाणं हेदेखील तितकं चांगलं नाही” “आम्ही त्यांच्याशी बोलणं थांबवलेलं नाही आणि शेतकरी म्हणून आमच्याशी चर्चेसाठी ते कधीही येऊ शकतात. जो मुद्दा आता उपस्थित केला जातो आहे ते कृषी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय नाही. शेतकऱ्यांनी मंत्र्यासोबत शांतपणे बसून यावर चर्चा करावी आणि ही समस्या सोडवावी असी माझी विनंती आहे”, असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्ष काँग्रेसवर टिका करत सीतारामन म्हणाल्या, “शेतकऱ्यांना काँग्रेसनं जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. काँग्रेसचा ढोंगीपणा उघड झाला आहे”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!