Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले ४ हजार २५९ नवे रुग्ण , ८० रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात आज ४ हजार २५९ नवीन रुग्ण सापडले आहेत तर ८० जणांनी करोनामुळं आपला जीव गमावला आहे.  सध्या राज्यात ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ९४९ रुग्णांनी करोनावर मात करुन घरी परतले आहेत. आतापर्यंत १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३. ४६ टक्के इतका झाला आहे.

राज्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या ४८ हजार १३९ इतकी झाली असून राज्यातील मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १८ लाख ७६ हजार ६९९ (१६.१३ टक्के) चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९(१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!