VidarbhaCrimeUpdate : धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या आजीसह लहान भावाची धारधार शस्त्राने हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने कथित प्रेयसीच्या  आजी आणि  दहा वर्षीय भावाचा जीव घेतला आहे. दिवसा ढवळ्या ६५ वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि १० वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने आज नागपूरात खळबळ माजली आहे. दरम्यान, हत्या करणारा तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याला अटक होईपर्यंत पोलिसांनी त्याचे नाव गुपित ठेवले आहे.

Advertisements

याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये आज दुपारी हि धक्कादायक घटना  घडली . धुर्वे कुटुंबाच्या तरुण मुलीच्या ( हत्या झालेल्या यशची मोठी बहीण ) मागे लागलेल्या माथेफिरुने धारधार हत्याराने आधी लक्ष्मीबाई (६५) आणि नंतर १० वर्षीय चिमुकला यशची हत्या केली.  गांधीबाग परिसरातला एक तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीचा पाठलाग करीत होता. दरम्यान मेहनत करून कुटुंब चालवणाऱ्या धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीची  समजूत घातली. त्यानंतर तिने त्या तरुणासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान आज दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला आणि पसार  झाला . शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपलं सरकार