Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : व्वा रे पठ्ठया !! चक्क सरन्यायाधीशांच्या आईचीच अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली !!

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटकही करण्यात आली आहे. तापस घोष असे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस या तपासाबाबत गोपनियता बाळगत आहेत.

या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे कुटुंबीयांचे आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित निवासस्थान आहे. त्यावर सीझन लॉन तयार करण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वी तापस घोषला हे लॉन चालवण्यासाठी देण्यात आले आहे. भाड्यापोटी मिळणाऱ्या पैशांचा हिशेब तापस घोष आणि त्याची पत्नी ठेवायचे. या लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्याकडे आहे. त्या वयोवृद्ध असून, आजारी असतात. घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लॉनच्या भाड्यापोटी मिळालेल्या रकमेत अफरातफर केली. बनावट पावत्या करून रक्कम हडपली.

दरम्यान हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. फसवणूक झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलिसांनी घोष दाम्पत्याचीही चौकशी केली. चौकशीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. तथ्यांच्या आधारावरून मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तापसला अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!