Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात आज  ४ हजार ७५७ नवीन रुग्ण आढळले असून ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाला आहे .  दरम्यान आज ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ९२ टक्क्यांवर स्थिरावलेला रिकव्हरी रेट वाढून आज ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर  राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या २.५८ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख २३ हजार ३७० करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९३.०४ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ७३ हजार ७०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५२ हजार २६६ (१६.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ९०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या (अॅक्टिव्ह रुग्ण) करोना बाधितांचा आकडा ८० हजार ७९ पर्यंत खाली आला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १५ हजार ४२३, ठाणे जिल्ह्यात १४ हजार ४४१ तर मुंबई पालिका हद्दीत १४ हजार ५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनासाठी हे तीन प्रमुख हॉटस्पॉट ठरले असून तिन्ही ठिकाणी नवीन रुग्णसंख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!