Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : व्हाॅटसअॅपवरुन लागला दरोडेखोर हमालांचा शोध, दोघांना बेड्या, जिन्सी पोलिसांची कारवाई

Spread the love

औरंगाबाद – शहरातील रेकाॅर्डवरच्या चोरट्या हमालांनी महाराजा मिक्सर मोठ्या प्रमाणात नाशिक मधे विक्री केल्याची माहिती जिन्सी पोलिसांनी व्हाॅटस अॅपवर व्हायरल करताच गुजराथ पोलिसांनी जिन्सी पोलिसांशी संपर्क साधून दोन चोरटे आणि २०लाखांचा मुद्देमाल जप्त केला. व गुजराथ मधील ४० लाखांची चोरी उघडकीस आणली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश बाबाजी पुतमाळे (२७) धंदा हमाली, सतीष रेवनाथ बनकर(३०) धंदा हमाली दोघेही रा माळीवाडा अशी अटक आरोपींची नावे आहे. वरील आरोपींनी गुजराथ मधील अहमदाबाद जिल्ह्यातील असलाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुबेरखान आणि जावेद कुरेशी रा असलाली या दोन हमालांसोबत असलाली येथील जगत नरेंद्र पटेल(४३) या व्यापार्‍याचे नोव्हेंबर २० मधे दुकान फोडून १०एलइडी आणि महाराजा कंपनीचे मिक्सर जुस्यर असा ४०लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी केल्या नंतर अर्धा मुद्देमाल जावेद आणि जुबेर यांच्या हवाली करुन अर्धा मुद्देमाल शहरात आणल्याची कबुली दिली.
असलाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या जवळपास ३५० व्हाॅट्सअॅप ग्रुपवर नाशिक मधे औरंगाबादचे चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात महाराजा कंपनीचे मिक्सर विकल्याचा मेसज १ डिसेंबर रोजी व्हायरल केला. पण कोठूनही प्राॅपर रिप्लाय येत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात बडोदा पोलिस त्यांच्या तपासासाठी औरंगाबादेत आले असतांना त्यांनी व्यंकटेश केंद्रे यांच्या कडून मदत घेतली होती.पण बडोदा पोलिसांच्या नंबरवर मेसैज पाठवला नाही म्हणून फाॅरवर्ड केला. तिथले एक पीएसआय वाघेला हे सध्या अहमदाबाद जिल्ह्यातील असलाली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक
असलाली पोलिस निरीक्षक पी.आर. जडेजा यांना सांगितले.

दरम्यान जडेजा यांनी नोव्हेंबर महिन्यातील असलालीच्या महाराजा कंपनीचे डिलर असलेले दुकान फोडल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून चोरीस गेलेला मुद्देमाल वर असलेली बिल्टी चेक करण्यासाठी पीएसआय शिवनंदन वाघेला यांना औरंगाबदला रवाना केले.जिन्सी पोलिस ठाण्याचे पीएसआय दत्ता शेळके यांच्या सोबत पीएसआय वाघेला यांनी नाशिक येथे जाऊन मिक्सर तपासले असता. मुद्देमाल असलालीचाच असल्याची खात्री झाली.पीएसआय शेळके यांनी माळीवाड्यातल्या दोन हमालांना चौकशीसाठी ताब्यात घेताच वरील गुन्हा उघडकीस आला.

वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पीएसआय दत्ता शेळके, शिवनंदन वाघेला, पोलिस कर्मचारी नंदू चव्हाण, संजय गावंडे, संपत राठोड यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!