Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ५ हजार २२९ नवे रुग्ण तर १२७ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार २२९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ६ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  सध्या ९२.८१ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत या आजाराने ४७ हजार ५९९ रुग्णांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक १० हजार ९४५ रुग्ण एकट्या मुंबईत दगावले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.५८ टक्के एवढाआहे.

दरम्यान आतापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ (१६.५५ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात करोनाचे सध्या ८३ हजार ८५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या सर्वाधिक १९ हजार ५५३ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून त्याखालोखाल १४ हजार ९९० रुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. मुंबई पालिका हद्दीत सध्या १३ हजार ७५४ रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांत दाखल आहेत. बाकी जिल्हे आणि पालिका हद्दींतील स्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!