Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलनाचा देशभरात वणवा , ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

Spread the love

शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. संशोधन नको, कायदा मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रत्येक राज्यात शेतकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गेल्या ९ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं  आंदोलन चालू आहे. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. उद्या ५ डिसेंबरला दुपारी दोन वाजता पुन्हा शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांसंदर्भात  गुरुवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी संघटनांनी पुन्हा बैठक बोलावून आपसात चर्चा केली. या बैठकीनंतर संयुक्त शेतकरी आघाडीने पत्रकार परिषद घेतली. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सरकार या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे, मात्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत अशीच आमची मागणी असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. आम्ही सरकारशी कालच चर्चा केली आहे आणि हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत असे आम्ही सरकाला स्पष्टपणे सांगितले आहे, असे सिंधु सीमेवर झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले कि , या व्यतिरिक्त आम्ही ८ डिसेंबरला संपूर्ण देशात टोल प्लाझा मोफत करणार असून दिल्लीतील उरले सुरले सर्व रस्तेही बंद करणार आहोत, असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. शेतकरी उद्या ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे  केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ‘दिल्ली चलो’ नावाने सुरू झालेले हे आंदोलन आता देशव्यापी बनले आहे. येथे जमा झालेल्या शेतकरी आणि आंदोलकांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच त्यांना मिळणारे समर्थनही वाढतानाच दिसत आहे. दरम्यान सरकार वीज कायदा आणि पेंढा जाळण्यासंदर्भातील दंडाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य असल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी येथे यावे असे आमचे म्हणणे आहे. ही लढाई आरपारची आहे. आम्ही मागे हटणारे नाहीत. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदचेआवाहन केले आहे, असे हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!