Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HyderabadNewsUpdate : GHMC Election 2020 : अभिव्यक्ती : हैदराबादेत “भगव्या स्ट्राईक”ने एमआयएमच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कमळाचा ” भाग्योदय !!”

Spread the love

Results of 149 of total 150 wards declared. TRS wins 55 seats, BJP 48, AIMIM 44 and Congress 2

लोकांना सध्या वाटणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तेलंगणामध्ये प्रवेश करून देशभर गाजविलेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीतील विजयाचा भाजपकडून उत्सव चालू आहे.आमची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव ” भाग्यनगर ” करू असे आश्वासन देत भाजपने एका शहराची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निमित्ताने कमळाचा ” भाग्योदय ” व्हावा हि भाजपची इच्छा होती परंतु स्थानिक तेलंगणा राष्ट्र समितीने भाजपचा हा घोडा थांबवला असला तरी भाजपने मिळवलेल्या ४८ जागा हा विजय थोडा नाही. अंतिम निकालानंतर टीआरएसने पूर्ण बहुमत मिळवले असून  भाजपने सभागृहात विरोधी पक्ष नेते पॅड पटकावले आहे तर देशभर हैदराबादचा भूमिपूत्र म्हणून मिरवणाऱ्या खा. ओवैसींच्या पक्षाला टाईम्सच्या भाषेत ” थर्ड स्पॉट ” मिळाला आहे.

दरम्यान या यशामुळं हैदराबादच्या बाहेर एमआयएमचे झेंडे लावण्यासाठी निघालेल्या खा . असदुद्दीन ओवेसी  यांचे त्यांच्या घरातच तोंड आवळण्याचा प्रयत्न केला आहे . कारण प्रचारात एमआयएमचे मुखिया ओवैसी आणि अमित शहा , योगी आदित्यनाथ यांच्यातच हैदराबादच्या नावावरून जुंपली होती. अर्थात अशा प्रचाराचा या दोघांनाही सारखाच फायदा आहे. जणू काही या दोघांचीच हि निवडणूक होती.  परंतु यात टीआरएसचा रोल मोठा होता हे अनेकांना माहित नव्हते . ते आता माहित झाले आहे. एकूण १५० जागा असलेल्या या महापालिकेत सकाळी जेंव्हा राम प्रहराच्या नंतर ” जय श्रीराम ” म्हणून भाजप कार्यकर्ते मतमोजणीला आले तेंव्हा पोस्टल मतांमध्ये भाजपने ८० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे दिल्लीपर्यंत गेले तेंव्हा भाजपचे वाचाळवीर संबित पात्र यांना इतक्या उकळ्या फुटल्या कि त्यांना ट्विटरवर साक्षात लक्ष्मीचा फोटो टाकून ट्विट करण्याचा मोह आवरला नाही. पण पुढे सगळे पसे उलटे सुलटे पडत गेले आणि निकाल आपल्या समोर आहेत.

या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाच्या जनतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली असून मोदींच्या विकासविषयक राजकारणावरचा हा विश्वास असल्याचे ट्विट करून अत्यंत परिश्रमपूर्वक यश मिळविल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तर या निकालावर प्रतिक्रिया देताना खा . असदुद्दीन ओवेसी  यांनी म्हटले आहे कि , ” हम भाजपा के साथ लोकतांत्रिक तरीके से लड़ेंगे। हमें भरोसा है कि तेलंगाना की जनता भाजपा को राज्य में अपने पदचिन्हों का विस्तार करने से रोक देगी. ” खरे तर या दोघांनी परस्परांचे अभिनंदन करायला हवे. या निमित्ताने या दोन्हीही पक्षांचा विस्तार होऊ शकतो.

मोदी -संघाचे सरदार विरुद्ध रझाकार आणि निजाम

हैदराबाद महापालिकेच्या या निवडणुकीला भाजपने राष्ट्रीय निवडणूक बनविले होते. त्यामुळे त्यांनी  पूर्ण ताकद पणाला लावली होती. गृहमंत्री अमित शाहांपासून ते नड्डा , योगी आदित्यनाथ या मुलुखमैदानी तोफाही हैदराबादमध्ये धडाडल्या  जणू निजामाला हरवून हैदराबाद काबीज करायलाच हे मोदी आणि संघाचे सरदार आलेले आहेत. खरे तर त्यांना आव्हान होते ते सत्ताधारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष  असलेल्या टीआरएसचे पण त्यांच्यावर जाहीर सभा घेऊन भाजपला ४८ जागा नक्कीच मिळवल्या नसत्या आणि एमआयएमलाही आपली इज्जत ४४ जागांपुरती का होईना वाचवता आली नसती हे उघड आहे. टीआरएस विरुद्ध भाजप हे खूपच अळणी अळणी वाटतं . पण अमित शहा – योगी विरुद्ध असदुद्दीन आणि अकरबुद्दीन ओवेसी  हा सामना कसा लोकांना खऱ्या खुऱ्या युद्धासारखा वाटतो . त्यामुळे हाती आलेले निकाल म्हणजे या राजकीय रणनीतीचा हा भाग आहे. हे लोकांना जेंव्हा समजते तेंव्हा यांची लुटुपुटुची लढाई संपलेली असते. आणि परिणाम समोर असतात. मग महाराष्ट्र असो , बिहार असो कि आता पश्चिम बंगाल असो कि कुठल्याही निवडणूका या दोन्हीही पक्षांच्या नेत्यांचे “वर्ड वार ” गाजत आले आणि गाजणार हे नक्की आहे. आणि या युद्धात काँग्रेसचा सुपडा साफ होणार हे सुद्धा नक्की. महाराष्ट्र , बिहार मध्येही हेच झाले आणि या महापालिका निवडणुकीतही हेच झाले . काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या. बरे झाले या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोनिया गांधी , राहुल आणि प्रियांका आले नाही , नाही तर काँग्रेसचा पुन्हा एकदा राष्ट्रीय पराभव झाला असता.

अशी आहे जागांची विभागणी

दरम्यान भाजपने त्यांच्या स्टाईल प्रमाणे या प्रचारात हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याचा मुद्दा आणला तर अपेक्षेप्रमाणे , खा . असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या बंधूंनीही एमआयएम स्टाईलने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्याचा परिणाम म्हणून चारमिनार आणि खैराताबाद या दोन झोनमध्ये एमआयएमला एक गठ्ठा ४२ जागा मिळाल्या तर त्याच झोनमध्ये भाजपला १६ जागा मिळाल्या तर याउलट एल बी नगर आणि सिकंदराबाद मध्ये तब्बल २९ जागा मिळवता आल्या. या भागात एमआयएमला १ जागा मिळाली .  सत्ताधारी टीआरएस ने मात्र या चार झोनसह सहाही झोनमध्ये ५५ जागा मिळवल्या आहेत किंवा टिकवला आहेत असे म्हणता येईल.  निवडणुकीची आचारसंहिता असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कायद्याची तम न बाळगता भाग्यलक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन , हैदराबादला निजामाच्या संस्कृतीतून मुक्त करायचं असून एक प्रगत शहर बनवायचं आहे, अशी घोषणा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केली होती. मतांचे ध्रुवीकरण करण्याचे षडयंत्र यापेक्षा वेगळे काय असू शकते ? त्यावर लगेच रझाकार , निजाम या शब्दांना खा . असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिले नसते तरच नवल.

हैदराबाद नंतर भाजपची  चेन्नईवर स्वारी

मुळात हैदराबाद हे दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. दक्षिण भारतात कर्नाटकचा अपवाद वगळला तर भाजपला फारशी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.  या निमित्ताने ती करावी म्हणून भाजपची हि हैदराबादवरील स्वारी होती  यानंतर आता त्यांना हैदराबादमार्गे तामिळनाडूच्या चेन्नईवर स्वारी करण्याची इच्छा आहे. या निवडणुकाही आता  येत आहेत. या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील यश भाजपच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

२०१६ च्या महापालिका निवडणुकीचे चित्र असे होते

आंध्र -तेलंगणाच्या राजकीय अभ्यासकांच्या मते  भाजप अत्यंत आक्रमकतेने तेलंगणात पाय रोवण्याच्या मनस्थितीत आहे. महापालिका क्षेत्रात विधानसभेचे २४ मतदारसंघ आहेत. तेलंगणात पुढची विधानसभा निवडणूक २०२३ ला होईल. त्याच्या पूर्व तयारीसाठी हि रणभूमी तयार करणे भाजपला महत्वाचे न वाटले तरच नवल. २०१६ च्या महापालिका निवडणुकीत टीआरएसकडे  ९९ आणि एमआयएमकडे ४४ जागा होत्या. तर डिसेंबर २०१८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने एकतर्फी विजय मिळवला होता. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने टीआरएसकडून चार जागा हिसकावून घेतल्या. १० नोव्हेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.

  • बाबा गाडे । औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!