Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MLC Election Results Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत सेनेचा पराभव , अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

Spread the love

अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. सरनाईक यांनी विद्यमान आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना पराभूत केले असून सरनाईक यांना १५ हजार ६०६ मते तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली आहेत. विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

अमरावतीचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात १५ हजार ६०६ मतांसह सरनाईक यांनी विजयाला गवसणी घातली आहे. प्रा. देशपांडे यांना ९ हजार १९१ मतांपर्यंतच मजल मारता आली. या मतदारसंघात एकूण २९ हजार ८२९ मते वैध ठरली होती. त्यामुळे विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो मॅरेथॉन मतमोजणीनंतर सरनाईक यांनी पूर्ण केला. देशपांडे यांना राष्ट्रवादीचे बंडखोर चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांच्यामुळे फटका बसल्याचे दिसत आहे. भोयर २५व्या फेरीपर्यंत टक्कर देत होते. ते बाद झाल्यानंतर सरनाईक व देशपांडे यांच्यात लढत होती व त्यात सरनाईक यांनी कोटा पूर्ण करत विजय साकारला.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे सहा हजार ८२३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान आमदार अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानावर राहिले. या निकालासोबतच पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून अनेक अर्थांनी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल बाकी असून तिथे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. सरनाईक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यात तिथे जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आता फक्त याच मतदार संघातील निकाल बाकी आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारी यांचा विजय. वंजारी यांना दुसऱ्या पसंतीची ६० हजार ७४७ मते.

अमरावती: २१ व्या फेरीत अपक्ष किरण सरनाईक यांची सुमारे १ हजार ४२ मतांची जोरदार मुसंडी. त्यांना १८९८ मतांची आघाडी

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे बाद

शरद पवार यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. दोन जागांवर विजय तसेच दोन जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय असल्याचं म्हटलं आहे.

नागपूर हा भाजपचा आणि संघांचा बालेकिल्ला आहे असे म्हटले जात होते परंतु ज्या पद्धतीने आमच्या तिन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले हा त्याचा विजय आहे. हा दीक्षाभूमीच्या विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल . महाविकास आघाडीच्या एकजुटीची शक्ती ओळखण्यात आमची चूक . मतदारांची नोंदणी आम्हाला करता अली नाही. त्यात आम्ही कमी पडलो. माझ्याच घरची चार नावे नाहीत. गडकरींच्या घरातली काही नावे नाहीत. आम्ही आत्मचिंतन करू . सेनेला एकही जागा मिळाली नाही. : देवेंद्र फडणवीस

निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही : चंद्रकांत पाटील

‘पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही निकराने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर  पदवीधर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. अभिजित वंजारी यांना एकूण 55 हजार 947, संदीप जोशी यांना 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे यांना 8 हजार 499 तर निलेश कराळे यांना 6 हजार 889 मते मिळाली. त्यानुसार अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आलं.

अमरावती: २१ व्या फेरीत अपक्ष किरण सरनाईक यांची सुमारे १ हजार ४२ मतांची जोरदार मुसंडी. त्यांना १८९८ मतांची आघाडी

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पराभव करत 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रचारकार्यांत उतरल्यानं यंदा पुण्याची लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती.

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रिककडे वाटचाल. तिसऱ्या फेरीअखेर मिळालेल्या मताधिक्यानंतर उमेदवार चव्हाण तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला जल्लोष.

नागपूर पदवीधर मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना ४७ हजार ३७१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ३४ हजार ६६४ मते.

पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये विजयासाठी २५ हजार ११४ मतांचा कोटा निश्चित. या मतांचे लक्ष्य गाठणे कोणत्याही उमेदवाराला शक्य होणार नसल्याचे चित्र.

नागपूर पदवीधर मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांना ३५ हजार ५०९ तर भाजपचे संदीप जोशी यांना २५ हजार ८९८ मते.

नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी : दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांची आघाडी कायम. दुसऱ्या फेरीअखेर वंजारी यांना २४ हजार ११४ तर भाजपचे संदीप जोशी यांना १६ हजार ८५२ मते.

अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी.. 30918 हजार मतांची मोजणी पूर्ण… दुसऱ्या राउंड नंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर.

किरण सरनाईक,अपक्ष – 6088

श्रीकांत देशपांडे(महा विकास आघाडी) – 5122

शेखर भोयर,अपक्ष – 4889

संगीता शिंदे अपक्ष उमेदवार – 2857

नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी : पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी आघाडीवर तर अमरावतीत  अपक्ष उमेदवार आघाडीवर, भाजप चौथ्या क्रमांकावर

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या मोजण्याची पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळाली आहेत . पहिल्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांनी 16 हजार 906 मतांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या दोन लाख 40 हजार 796 मतदान पैकी 56 हजार मतांच्या मोजणी ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.  विशेष म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पदवीधर मतदारांची ५५०० मते  बाद झाली आहेत .

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीला दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. निकालाचा पहिला प्रथम पसंतीचा कल हाती आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर आहे. तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे नेते जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

धुळे-नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात भाजपला जबर धक्का बसला आहे. पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे पिछाडीवर गेले आहेत. तर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3131 मतांसह आघडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना 2300 आणि शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 2078 मत मिळवली आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत एकूण 1248 पोस्टल मतदान पैकी एक हजार 73 मते अवैध ठरली तर 175 मते बाद झाली . एकूण वैध मतांपैकी   महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी 600 मते घेऊन 314 मतांची आघाडी घेतली तर शिरीष बोराळकर यांना 286 मते मिळाली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीतील 56 हजार पैकी 20 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून या मतमोजणीत प्रथम क्रमांकाच्या मतांमध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सध्या बीड जिल्ह्यातील मतमोजणी सुरू असून या मतमोजणीत महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे आघाडीवर असले तरी भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासह बीडचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे रमेश पोकळे यांनी सुद्धा बऱ्यापैकी मते घेतली आहेत.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येकी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम पूर्ण. आतापर्यंतच्या मतमोजणीच्या प्रक्रियेनुसार प्रथम क्रमांकाची मते दिलेल्या मतपत्रिकांचे उमेदवारनिहाय गठ्ठे तयार झाले आहेत. यानंतर अवैध मतपत्रिका बाजूला काढून वैध मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर विजयासाठी कोटा निश्चित होईल.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला हळू हळू गती येत असून पोस्टल मतांच्या मोजणीत 1248 मतदारांपैकी 175 मते अवैध ठरली आहेत. यापैकी  आता 1073 मतांची मोजणी सुरू आहे अद्याप कुठलाही कोटा ठरविण्यात आलेला नाही. मतमोजणीच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर त्यातील वैध मतांची बेरीज करून त्याला दोन ने भागून त्यात एक मिळवून जी संख्या येईल तो विजयाचा कोटा ठरविण्यात येईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असून प्रत्यक्षात झालेल्या 240796 मतांची 25-25 च्या गठ्ठयात जुळवणी करून त्यातून वैध अवैध मते बाजूला करणे आणि ३५ उमेदवारांचे पसंतीक्रम ठरवणे अत्यंत वेळखाऊ काम आहे. रात्री ८ वाजेपर्यंत हि जुळवाजुळव झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल.

औरंगाबाच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील मराठवाडा प्रायव्हेट लिमिटेड च्या जागेत मतमोजणी सुरु आहे.  373166 पैकी 240796 मतांची मोजणी करायची आहे. या मतांची ५६ टेबलवर जुळवाजुळव चालू आहे. दरम्यान मतांच्या घड्या उघडल्या जात असताना  काही मतदारांनी मराठा आरक्षण विषयी चा मजकूर मत पत्रिकेच्या मागील बाजूने लिहिला आहे तर काहींनी मोबाईल नंबर आणि स्वतःची नावे टाकली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . अर्थात ही सर्व मते बाद होणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक- २०२०: विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

– ‘धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीतील विसंवाद आणि मतभेदांचा स्फोट आहे. हेच चित्र उर्वरित निकालांतही दिसेल,’ असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

– नागपूरमध्ये मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात पहिला कल 3 वाजता येण्याची शक्यता

नागपूर पदवीधर निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, २८ टेबलवर सुरु झाली मतमोजणी, पहिल्या फेरीचा कल ३ वाजेपर्यंत येण्याची शक्यता, तर अमरावती शिक्षकमध्ये अद्याप मतपेट्या उघडणे सुरू असून २५ – २५ गठ्ठे बनवणे सुरू आहे.

 

– विभागीय आयुक्त सौरभ राव – पुणे विभाग पदवीधर संघासाठी ८६७, शिक्षक मतदार संघासाठी ३२ पोस्टल मते आहेत. या पोस्टल मतांची स्वतंत्र मोजणी करण्यात येणार नाही. सध्या मतपत्रिका एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये ही पोस्टल मते मिसळण्यात येणार आहेत.

 

– धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या अमरीश पटेल यांचा विजय. पटेल यांना ४३४ पैकी ३३२ मते, तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते

– औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 मतमोजणीसाठी सकाळी 8 वाजता सुरवात

– पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात.

– नागपूर पदवीधर मतमोजणीस प्रारंभ, टपाल मतांची मोजणी सुरू.

– थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; १९ उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!