Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच : मोदी सरकारचा निषेध करून प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत

Spread the love

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी , ” मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो”  असं म्हणत पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे जाचक आहेत. शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही या गोष्टींचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंदसा यांनी देखील कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे. आपला सन्मान परत करतांना प्रकाशसिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. सुमारे तीन पानांच्या या पत्रात प्रकाशसिंग बादल यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध दर्शवला आहे. यासह सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेधही केला आहे. तसेच पत्रातच त्यांनी आपला पद्मविभूषण पुरस्कार परत देण्याविषयी बोलले आहे.

आठवडाभरापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबले आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच राबवलेल्या कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठकही झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

दरम्यान मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा निषेध नोंदवत सध्या पंजाब, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी तर निषेध म्हणून मोदी सरकारचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांना चर्चेचं निमंत्रण देत सरकारने बैठक घेतली. त्यातल्या पहिल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. दरम्यान केंद्र सरकारने आणलेले हे कायदे जाचक आहेत असं म्हणत अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!