Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्याचा उद्देश केला स्पष्ट

Spread the love

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. या निमित्ताने बोलताना , आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही. आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहे , असे  स्पष्टीकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले  आहे. उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या फिल्म सिटीवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बॉलिवूडला मुंबई बाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.


सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली. ” उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहील. आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि , ‘आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो नाहीये. आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलोय. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा, समाजाला चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकानं दिली पाहीजे. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील फिल्मसिटी त्यांचं काम करेल.’

योगी आदित्यनाथ यांना मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले,”आम्ही काहीही कुठेही घेऊन जाणार नाही. मुंबईतील फिल्म सिटी मुंबईत काम करणार. नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार उत्तर प्रदेशात नवीन फिल्म सिटी उभी करणार आहोत,” असं म्हणत योगी यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!