Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विधवा भावजयीवर लैंगिक अत्याचार तर पुतणीचा विनयभंग , दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : दिराने आपल्या विधवा भावजयीवर गेल्या पाच वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित ४१ वर्षीय महिला श्रीनिकेतन कॉलनी येथे आपल्या दोन मुलांसह राहते. पीडितेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या दिराने पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी सलगी करण्यास सुरूवात करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्यावेळी पीडितेने त्यास नकार दिला होता. एप्रिल २०१५ मध्ये पीडित महिलेचे मुले घरी नसल्याची संधी साधून  दिराने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच याची वाच्यता केल्यास तुझी समाजात बदनामी करेन अशी धमकी देत दिराने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेची मुलगी घरात असतांना दिराने तिच्यासोबतही अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार करणा-या दिराविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहेत.

निर्दयी मातेविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : अनैतिक संबधातून जन्मलेले चार दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून देणाऱ्या  निर्दयी मातेविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने अर्भक टाकून  पलायन केल्याचा प्रकार ज्योतीनगर येथील साकार शिशुगृह येथे १ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास समोर आला. याप्रकरणी साकार बाल कल्याण समितीचे व्यवस्थापक विजय बंडू मगरे (वय ३८, रा.अजमेरा कॉम्पलेक्स,ज्योतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्भक टाकून  पलायन करणाऱ्या  महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———————————————

विविध घटनेत दोघे जखमी

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागात घडलेल्या दोन अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. कपील उपेंद्र कुतूर (वय २०, रा.श्रीपाद पोलिस कॉलनी, जटवाडा रोड, हर्सुल) हा तरूण १ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेडिकलवर औषधी आणण्यासाठी जात होता, त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कार क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-४२१०) च्या चालकाने कपील कुतूर याच्या दुचाकीस धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने कपीत कुतूर यास शिवीगाळ करून घटनास्थळावरून धुम ठोकली.
दुसNया घटनेत, बालाजी शामराव निरगुडे (वय ५८, रा.शिवाजीनगर, गारखेडा परिसर) हे ३० नोव्हेंबर रोजी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएफ-०४६८) वर वॅâनॉट गार्डन सिडको एन-६ येथून जात होते. त्यावेळी लोडींग रिक्षा क्रमांक (एमएच-२१-बीएच-०९९१) ने निरगुडे यांच्या दुचाकीस धडक दिली. या दोन्ही अपघातांची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!