Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर

Spread the love

यूजीसी नेट निकाल 2020 जाहीर झाला आहे. या परीक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे. एनटीएने 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 ची परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी नोंदणीकृत 8,60,976 उमेदवारांपैकी केवळ 5,26,707 परीक्षार्थीच उपस्थित राहिले होते. यावेळी नेट परीक्षा (सीबीटी) संगणक पद्धतीने घेण्यात आली होती. यात 12 दिवसांमध्ये 81 परीक्षा घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणक आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील पाहू  शकता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!