Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : काय वाकडं करता ? पाहतो … असे जिल्हाधिकार्‍यांसमोर बोलला आणि कोर्टाने ” त्याला ” पाठवले हर्सूल तुरुंगात !!

Spread the love

औरंगाबाद -गरवारे परिसरातील कलाग्राम मधून पदवीधर निवडणूकीची तयारी पाहून परतत असतांना आंबेडकर चौकात श्रीरामपुरचे वाहतूक निरीक्षक अशोक वाघ यांचा मुलगा शशांक वाघने हुज्जत घातल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी शशांक ला गजाआड केले.पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर उभे केले असता त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे रविवारी रात्री ८ वा. कलाग्राम मधे मतदानानंतर जमा हौणार्‍या मतपेट्यांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गेले होते.रात्री ९ वा परतत असतांना आंबेडकर चौकात आरोपी चे आणि रिक्षा चालकाचे भांडण सुरु होते. जिल्हाधिकार्‍यांनी चौकात काय सुरु आहे हे पाहण्यासाठी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितली. सरकारी गाडी थांबत असल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाने धूम ठोकली.तर आरोपी शशांक वाघ जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना , ” नीट निघा,  काय वाकड करता ? ते पाहतो. ” असे उद्गार काढून गैरवर्तन केले. त्यामुळे सिडको पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द तक्रार देताच शशांक ला बेड्या ठोकल्या या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशौक गिरी करंत आहेत.

पोलिस पत्नीची पर्स भरदिवसा चोरी, ९०हजारांचा ऐवज लंपास

औरंगाबाद – पोलिस अधिक्षक कार्यालयात वाहन चालक असणार्‍या राजू संपाळ यांच्या पत्नीची पर्स समर्थनगरातून सोमवारी दुपारी १२च्या सुमारास कार मंधून लंपास झाली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संध्या राजू संपाळ(३५) रा.हडको या काही कामानिमित्त त्यांच्या कारमधून समर्थनगरात आल्याहोत्या. पर्स कारमधे ठेवून त्या कामानिमित्त बाहेर यैताच चोरट्याने त्यांची पर्स लांबवली.पर्समधे १८ग्रॅम ची सोन्याची पोत आणि १०हजार रु.रोख असा एकूण ९० हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी पुढुल तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!